रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या मुलींनी केले अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सदरक्षणाय खल निग्रहणाय या वाक्या प्रमाणे वर्षभर आपल्याला संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र एक करून नागरिकांना विविध सण उत्सव आनंदात साजरा करता यावेत यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर न राहता आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असणाऱ्या पोलीस बांधवांचे आपल्या सामाजिक जीवनात फार मोलाचे योगदान असते म्हणूनच परतुर येथील छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या विद्यार्थिनींनी परतुर पोलीस स्टेशनला रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.
यावेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके व शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर यांनी सर्व पोलीस बांधवांचे औक्षण करत राखी बांधली व रक्षाबंधना सारखा पवित्र सण पोलीस बांधवां सोबत साजरा केला.
यावेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांनी रक्षाबंधन निमित्ताने पोलिस हे 24 तास ऑन ड्युटी असताना त्यांना कोणताच सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करता येत नाही आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या पोलिसा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बांधिलकीच्या दृष्टी कोनातून रक्षाबंधन’ आपण पोलीस बांधवां सोबत साजरा करत आहोत असे विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी सहा पोलीस निरीक्षक जाधव, स.कॉ.शिंदे, पो.हेड.कॉ. गाढवे, पो.कॉ. गोविंद पवार, विजय जाधव,दीपक आढे, अच्युत चव्हाण, महिला पो. कॉ. सपना वाघ, कल्पना धडे यांची उपस्थिती होती.

