युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- अनुसूचित जाती, जमातींमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तथा सर्व प्रवर्गाला क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. या निर्णयाविरोधात अनुसूचित जाती, जमातीं मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
एस.सी आणि एस.टी समाजाचे वर्गीकरण करून त्यांना मिळणाऱ्या आरक्षणावर घाव घातले जात असल्याच्या विरोधात विविध सामाजिक राजकीय संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. यात कळमेश्वर येथील अरुण सहारे, राजेश श्रीखंडे, अरूण वाहाणे, युवराज मेश्राम यांचे नेतृत्वात मोर्चा काढून या आदेशाचा निषेध करण्यात आला.
भारत बंद च्या हाकेला हाक देऊन कळमेश्वर येथे दिनांक 21 आगष्ट ला मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातुन भ्रमन करून तहसीलदार यांना राष्ट्रपती महोदय यांचें नावाने निवेदन देण्यात आले. दिनांक 1आगष्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने एससी आणि एसटी आरक्षणात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन केले होते. यात महीलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.
यावेळी सिमाताई मानवटकर, जयमाला तभाने, सुमित्रा तायडे, नंदा डोंगरे, माला शेंडे, शिला जांभूळकर, संध्या ऊके, कांता बनसोड, हीरा बागडे, नंदा भंडारे, शारदा सोमकूवर, शिला जनबंधू आदी महिला सहभागी होत्या. तर नागरिका मध्ये काँग्रेसचे नेते सरजू मंडपे, समता सैनिक दलाचे विजय कापसे, हरिदास इंगळे, दिपक मेश्राम, अरूण गजभिये, चंद्रशेखर उके, ओमराज वासनिक, अनिल बोडखे, राहुल गोंडाने, संजय उके, रामदास कापसे, रवि देशभ्रतार, भरत भोंगाडे, तुळशिदास तागडे, भारतीय बौद्ध महासभेचे राजपाल बनसोड, राहुल आठवले, जितेंद्र देशभ्रतार, राजेंद्र डाहाट, देविदास रायबोले, प्रफुल बागडे, निशांत गायकवाड, वैभव मेश्राम, कामेश पाटील, धम्मपाल बनसोड, रोशन शेवाळे, कुणाल पाटील, सुरज गोरले, सुमित भगत, रौनक तांबे, मिथुन गोंडाने, आकाश शेवाळे, धिरज बागडे, मुकेश कापसे, रोहीत पळसवर ईत्यादी नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित होते.
यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भिम आर्मी, बिआर एसपी, विदर्भ शाहीर कलाकार परिषद, भारतीय बौद्ध महासभा, डाॅ. आंबेडकर विचारमंच, बिडी एसपी, बहुजन मुक्ती पार्टी, बीएसपी , विदर्भ राज्य आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल आदी संघटना सहभागी झालेल्या होत्या. कळमेश्वर येथील पोलिस निरीक्षक काळबांडे यांनी चोख बंदोबस्त केलेला होता व नगरपालिका ने अग्नी शामक वाहनांची व्यवस्था केली होती. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी एससी, एसटी व ओबीसी आरक्षन बचाव कृती समिती तालुका कळमेश्वर अथक परिश्रम घेतले.