श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे मंडळ अधिकारी सचिन सानप याला एक लाखाची लाच घेताना पोलिसांनी जेरबंद केल्याने खळबळ उडाली आहे. लाचखोर हा कोणत्याही कामात लाख, दोन लाखाशिवाय काम ना करणारा, तहसीलदार ते कलेक्टर सगळ्यांना गुंडळण्याची भाषा करणारा मस्तवाल मंडळ अधिकारी सचिन सानप याला एक लाखाची लाच स्वीकारताना सापडल्याची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली.
बीड येथील वादग्रस्त मंडळ अधिकारी सचिन सानप याच्याबद्दल शेतकरी असो कि सामान्य माणूस प्रत्येकजनाची एकच तक्रार होती, ती म्हणजे सानप पैशाशिवाय कामच करत नाही. किरकोळ कामासाठी म्हणजेच फेरफार मंजूर करण्यासाठी हा सानप लाख दोन लाख मागायचा. वरिष्ठाकडे तक्रार केल्यास हा त्या त्यांनाही मॅनेज करण्याची भाषा करायचा, सानप याच्यावर कारवाईसाठी उपोषण आंदोलन देखील झाले होते. मात्र कारवाई झालीच नाही, उलट आपल्याला तिनं वर्ष पूर्ण झाल्यावर देखील मी पर्यंत चार्ज रहावा यासाठी त्याने पालकमंत्री ते आरडीसी अशी फिल्डिंग लावली होती.
दरम्यान उतखनन झालेला माल कमी दाखवण्यासाठी लाचखोर सचिन सानप याने दोन लाख रुपये मागितले होते. त्यातील एक लाख रुपये तहसील कार्यालयात स्वीकारताना त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

