अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- देशात सर्वत्र आरक्षणावर हल्ला करण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु आहेत . माननिय सुप्रिम कोर्टाने एससी, एसटी प्रवर्गा संबंधात दिलेला निर्णय चुकीचा असून यातुन उलट समाजाच नुकसानच होणार आहे असा मुळ हेतु ठेऊन सुप्रिम कोर्टाच्या विरोधात भारत बंदच्या समर्थनात सावनेर येथे बुधवार दि. २१ आँगस्ट २०२४ ला सकाळी ११.३० वाजता डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन तहसिल कार्यालया च्या दिशेने मोर्चाची सुरुवात झाली. हा मार्च डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टाँप सावनेर येथुन सुरु होऊन राजकमल चौक, गांधी चौक, जयभिम चौकातुन होऊन तहसिल कार्यालयात पोहोचला यावेळी तहसिलदार मलिक विराणी मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
१) अनुसुचित जातीचे वर्गीकरण व अनु. जमार्तीना क्रिमीलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरूस्ती करून सर्वोच्च न्यायलायाचा निर्णय रद्द करणे.
२) न्यायाधिषांच्या नियुक्ती साठी कॉलेजियम पध्दत बंद करून न्यायाधिषांची नियुक्ती ऑल इंडिया जुडीशरी सर्व्हिस चे गठन करून यात आरक्षण लागू करावे.
३) एससी. एसटी, ओबीसी, भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेडयुल ९ मध्ये त्याचा समाविष्ट करावे.
४) जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार जातीनिहाय जनगणना करावी.
६) खाजगी संस्था प्राईवेट सेक्टर मध्ये आरक्षण लागू करावे.
७) जातीचे निर्मुलन करण्यासाठी टीसी वर जात लिहिणे बंद करावे व जार्तीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
८) अनुसुचित जाती, जमाती व मागासवर्गीयांचा रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे.
९) पदोन्न्तीमध्ये आरक्षण कायम ठेवणे
१०) खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करने.
या महामोर्चाच्या माध्यमातुन एससी, एसटी व ओबीसी च्या सामाजिक संघटना,राजकीय पक्ष व समाज बांधवांनी एकत्र येऊन या महामोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये बहुजन मुक्ती आंदोलनचे अध्यक्ष सुरेशजी डोंगरे, भगवान चांदेकर अध्यक्ष जनकल्याण सामाजिक संघटना, मयूर नागदवणे संयोजक भारतीय परिवर्तनवादी संघ (बीपीएस), ताराबाई गौरखेडे सावनेर विधानसभा प्रभारी बहुजन समाज पार्टी, दादाराव लांजेवार जिल्हासचिव वंचित बहुजन आघाडी, सुभाष मछले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिनेश इंगोले उपाध्यक्ष लोकस्वराज्य पार्टी व जय शिवाजी सामाजिक संस्था, माजी सैनिक राजेन्द्र आत्राम संस्थापक गोंडवान आदिवासी रिसर्च फाऊंडेशन सावनेर यांच्या नेतृत्वात सावनेर तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.