युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यात नागपूर जिल्हातील सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे ॲड. प्रकाश टेकाडे यांनी उमेदवारी साठी कंबर कसली आहे. सावनेर कळमेश्वर विधानसभा भारतीय जनता पक्षाने माझा विचार करावा व मला उमेदवारी द्यावी असे ॲड. प्रकाश टेकाडे यांनी म्हटल आहे.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना ॲड. प्रकाश टेकाडे म्हणाले, सर्व बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स, कार्यकर्ते व माझे सर्व पदाधिकारी सर्वांना माझा नमस्कार मी गेली 32 वर्ष भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे मी सरपंच, सभापती व जिल्हापरिषद या तीनही मधे काम केलं आहे कळमेश्वर तालुका मधे सभापती म्हणून प्रशासनाचा अनुभव व सावनेर तालुका मधे सावनेर येथे 1981 पासून स्वतःचे घर व शेतकऱ्यांचे संबंधित व्यापार या मुळे सर्व गावातील शेतकरी व जनतेशी जीवा भावाचे संबंध आहे मी कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे अनेक लोकांना प्रामाणिक मार्गदर्शन केले आहे मी भाजपा संघटन मध्ये तालुका अध्यक्ष,जिल्हा कायदा आघाडी अध्यक्ष, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष व दोनदा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
बंधुंनो मी जेव्हा जेव्हा पक्षाचा जो आदेश आला त्याचे मी प्रामाणिक पने पालन केले आहे कधीही पक्षाशी बेयिमांनी केली नाही स्वतःचे सर्व आयुष्य पक्षा मध्येच खर्च केले आहे मी 1995 ते 2019 पर्यंत पक्षांनी जो विधानसभेचा उमेदवार दिला त्याचे मी प्रामाणिक पने काम केले आहे कधीही नाराजी व्यक्त केली नाही परंतु बंधुंनो गेली 32 वर्ष पक्षा मधे केलेले काम व मी जपलेली माझी इमेज त्यामुळे आज माझी पक्षाला एकदा व शेवटची प्रामाणिक मागणी आहे की एका पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा आहे तरी माझ्या विधानसभेतील सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी यांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण मला साथ द्यावी असे अँड प्रकाश टेकाडे उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण म्हटल.

