उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सुरगाणा:- करंजाळी बोरगाव येथे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी आदिवासी सेना यांच्या जन आक्रोश आंदोलन गुजरात सुरगाणा हायवे करंजाळी बोरगाव ह्या चौफुली ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून १७ संवर्धन पेशा अंतर्गत आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष यांनी निदर्शने दाखवून गुजरात हायवे चक्काजाम केला.
यावेळी आदिवासी नेते जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा चक्काजाम विविध मागण्यासाठी करण्यात येत असून सरकारला अल्टिमेट दिले असून सुद्धा वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवून आदिवासी बांधव यांचा अवमान केला आहे. दिनांक २१ ऑगस्ट रोजी सरकारला निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रभर जन आंदोलन करू अशी करंजळीचे प्रतिष्ठित बिरारी सर व यशोधन देशमुख सर आंदोलन करते आदिवासी सेना महिला व पुरुष यांना एकजुटीने आपला न्याय निवाडा कसा होईल याबद्दल मार्गदर्शन देऊन आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच पुढे चालू राहिल असेही आश्वासन त्यांनी दिले.

