✒️नासिर सुलेमान खान, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येतील एका नराधम सावत्र बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मुलुंड येथील राहणाऱ्या 50 वर्षीय नराधम सावत्र बापाला बेड्या ठोकल्या आहे.
आपल्या पहिल्या पतीशी काडीमोड झाल्यानंतर एक विवाहिता ठाण्यात राहायला आली या महिलेला पहिल्या पतीपासून 15 वर्षे, 12 वर्षे आणि 9 वर्षे वयाच्या तीन मुली आहेत. तिला मुलगा नाही झाल्यामुळे तिच्या पतीने 2011 मध्ये तिला काडीमोड घेतला. त्यानंतर ती महिला आपल्या तीन मुलींसह ठाण्यात रहायला गेली.
ठाण्यात राहत असताना 2013 मध्ये तिची ओळख आरोपीशी झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2014 मध्ये तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले. आरोपी व्यवसायाने ड्रायव्हर आहे. लग्नानंतर तीन मुलींसह महिला आरोपीच्या मुलुंड येथील घरी रहायला गेली.
याआधीही आरोपीने गैरवर्तन करण्याचा केला होता प्रयत्न
याआधी 2020 मध्ये त्याने मोठ्या मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने तेव्हा त्याला समज देत पुन्हा असे वर्तन न करण्यासाठी बजावले होते.
शुक्रवारी आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला आणि पीडित मुलीच्या जबानीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.