दरवर्षी विध्यार्थी व शाळेला भेटवस्तू देऊन साजरा करतात वाढदिवस.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 22 ऑगस्ट:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समिती सतीश धोटे यांनी वाढदिवसा निमित्याने आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा शाळेला विविध वृक्ष, कुंड्या भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले, ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, रुपेश चिडे, जयश्री धोटे, अर्चना मारोटकर, रजनी पिदूरकर, प्राजक्ता साळवे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे, प्रशांत रागीट, वैशाली चिमुरकर, मनीषा खामणकर, पूजा विकास बावणे, माधुरी रणदिवे आदी शिक्षकांसह, शालेय मंत्रिमंडळ, स्काऊट गाईड, राष्ट्रीय हरित सेना विध्यार्थी ची उपस्थिती होती. बादल बेले यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.
सतीश धोटे यांच्या वाढदिवस निमित्याने दरवर्षी कधी शालेय विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य भेट, शालेय परिसरात वृक्षारोपण, शाळेकरिता वृक्ष, कुंड्या भेट तर कधी राष्ट्रीय हरित सेना विभागा तर्फे चालविल्या जाणाऱ्या पक्ष्याकरिता खाऊ – प्याऊ बचत निधी संकलनास आर्थिक सहकार्य केले जाते. त्यांनी शाळेकरिता दिलेल्या भेटीबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षक व विध्यार्थीनी आभार मानले आहे.