राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा आमदार समीर कुणावार यांच्यावर घनाघाती आरोप.
शासनाच्या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणीचे जीव धोक्यात टाकणाऱ्या आमदाराचा जाहीर निषेध.
शासनाच्या अनेक जागा उपलब्ध असताना देखील श्रेय वेडा आमदार कुणावार यांनी तहसीलदार व नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर दबाव टाकून जागाच उपलब्ध नसल्याचे दिले पत्र.
हिंगणघाट शहरात म्हाडाचे कॉटर खाली असून या कॉटर मध्ये व या परिसरात कार्यक्रम घेतला गेला असता तर महिलांची नाहीं झाली असती गैरसोय.
शासनाच्या वेगवेगळ्या जागा उपलब्ध असताना देखील, अनुसया मंगल कार्यालयात कुठलेही नियोजन न करता आमदाराच्या हट्टापोटी झाला कार्यक्रम. या कार्यक्रमात बेशुद्ध झालेल्या महिला व त्यांची झालेली गैरसोय यासाठी जबाबदार आमदाराने संपूर्ण लाडक्या बहिणीची मागावी जाहिर माफी: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा.कां. शरद पवार
फक्त दोनशे महिलांना जेवणाची व्यवस्था दाखवीत वीस हजारांच्या वर महिलांना साध पिण्याचं पाणीही न देता त्यांचा छळ करणाऱ्या आमदारांनी तात्काळ द्यावा राजीनामा.
इतर पक्षाच्या गाडीत आलेल्या महिलांना कीट न देता पाठविले जातं आहे वापस. बाराशे ते पंधराशे रुपयाला गरीब लाडक्या बहिणीला विकले टोकन. किट वाटप कार्यक्रमात देखील केला भ्रष्टाचार.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासनाच्या योजनेचे श्रेय स्वतः लाटण्यासाठी हपापलेल्या आमदार समीर कुणावार यांनी शासनाच्या अनेक जागा उपलब्ध असताना देखील, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तहसील तसेच नगरपालिकेत कुठलीही जागा उपलब्ध नाही असे खोटे पत्र घेऊन शहालंगडी रोडवरील अनुसया कार्यालयात शासनाची योजना स्वतः श्रेय घेत राबवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र या आयोजनात नियोजनाचा शंभर टक्के अभाव असल्याने वीस हजाराच्या वर आलेल्या महिलांचे नाहक हाल आमदार समीर कुणावार यांनी आपल्या स्वतःच्या खोट्या प्रसिद्धीसाठी करून घेतले.
हिंगणघाट तालुक्याच्या कार्यक्रमांमध्ये हिंगणघाट तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून देखील महिला मेसेज टाकून आमदार कुणावार यांनी गर्दी दाखवण्यासाठी म्हणून बोलाऊन घेतल्या होत्या. किट घेण्यासाठी म्हणून आधल्याच दिवशी रात्री आठ वाजल्यापासून आलेल्या महिला रात्रभर बाहेर पाण्यात ओल्या होत होत्या. या ओल्या झालेल्या महिलांची जेवणाची तर सोडा साध्या पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था आमदार समीर कुणावार यांनी केली नव्हती. सकाळी महिलांची चेंगराचेंगरी होणाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आले आहेत. यावेळी अनेक महिला बेशुद्ध देखील पडल्या मात्र प्रसिद्धीसाठी हपापलेल्या आमदाराने शंभर दोनशे महिलांच्या जेवणाची व्यवस्था दाखवित वीस हजाराच्या वर महिला पाण्याविना भुक्या तहानलेल्या तश्याच ठेवल्या. या लाडक्या बहिणी घरगुती साहित्य वाटपाच्या पेटीसाठी म्हणून आपल्या चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन आल्या होत्या हे मुलं देखील तसेच भूके व तहानलेले होते.
पहिलेच आमदार समीर कुणावार यांनी या कार्यक्रमात येणाऱ्या महिलांसाठी म्हणून दीड दीड हजार रुपये मागून भ्रष्टाचार करण्याची कुठलीही कसर ठेवली नव्हती. यानंतर पहिलेच दीड दीड हजार रुपये दिलेल्या महिला दोन-दोन हजार रुपयांच्या गाड्या किरायाने करून आल्या होत्या, मात्र त्यांना पिण्याचे पाणी देखील आमदार कुणावार यांनी उपलब्ध करून दिले नाही, यामुळें कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांची गैरसोय समीर कुणावार यांनी केली असल्याने त्यांनी तात्काळ सर्व महिलांची माफी मागावी. तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
आज पर्यंत हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात अनेक आमदार होऊन गेलेत मात्र शासनाच्या योजना जणू मीच आणल्या असं खोटं बोलून जनतेला दिशाभूल करण्यात आली, महिलांना अन्न पानी न देता तसेच ठेवणारा हा एक मात्र पहिलाच आमदार हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात दुर्दैवाने भेटला आहे. इतर पक्षाच्या गाड्या मध्ये जर महिला बसून आल्या असेल तर त्यांना साहित्य न देता सर्रास वापस पाठवण्याचा प्रकार हा आमदार करत असून आमदाराने तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकार, शहराध्यक्ष बालु वानखेडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, अल्पसंख्याक प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी, प्रचार प्रमुख संतोष तिमांडे , श्रीकांत भगत यांच्यासह सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.