रक्षाबंधन निमित्य सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे सत्कार.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- सेवा कलश फाऊंडेशन राजुराच्या वतीने गोंडपिपरी येथील कन्नमवार सभागृह येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील अंगणवाडी सेविका, अशा सेविका व मदतनीस यांचा विशेष सत्कार आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी आ. धोटे याना राखी बांधली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी आ. सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, अंगणवाडी सेविका, अशा सेविका आणि मदतनीस यांनी कोरोना काळात खुप मोलाची भूमिका बजावली. कोणत्याही परिस्थितीत समाजातील अगदी शेवटच्या घटका पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत आहेत. त्यामुळेत आपण आशा गटप्रवर्तकांना कंत्राटी पदावर समाविष्ट करणे, कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन श्रेणी व बोनस भत्ते मिळणे, वयाच्या ६५ वर्ष झालेल्या सेवानिवृती नंतर ग्रॅज्युविटीची रक्कम तात्काळ देणे इत्यादी मागण्या शासनाकडे लावून धरल्या. अखेर ३८६ सेवानिवृत महिला कर्मचाऱ्याना सेवा निवृतीचा लाभ मिळाला. तसेच सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात आरोग्य खाते आशागटप्रवर्तक फेडरेशन आयटक वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत गट प्रवर्तकांना शासकिय सेवेत कायम करण्यात यावे ही मागणी केली आहे. यापूढेही आपण आपल्या सर्वांच्या सोबत राहून संघर्ष करणार असल्याची ग्वाही सुध्दा त्यांनी दिली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शंभुजी येलेकर, अजय माडुरवार, देविदास सातपुते, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, महिला अध्यक्षा सोनीताई दिवसे, शहराध्यक्ष राजु झाडे, सचिन फुलझेले, श्रीनिवास कंदनुरीवार, संवर्ग विकास अधिकारी चनफने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागतोडे, सीडीपीओ गिता चाकेकण, सारनाथ बक्षी, यासह परिसरातील अंगणवाडी सेविका, अशा सेविका आणि मदतनीस, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.