मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र जाणार का, अशी भीती आता जनतेत वाढत आहे. कारण करोना महामारीच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधीनी हिंगणघाट शहरातील आपल्या मित्र खाजगी डॉक्टरला लाभ मिळवून दिला तसाच लाभ हिंगणघाट येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरापासून दूर नेऊन खाजगी डॉक्टरांचा व्यवसाय पूर्वरत सुरू ठेवण्यासाठी हा सर्व आटापिटा हिंगणघाट येथील लोकप्रतनिधींकडून केला तर नाही जात आहे ना? अशा प्रश्न आज हिंगणघाट शहरातील नागरिकाना पडला आहे.
कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरानजिक व्हावे म्हणून मागील अनेक दिवसापासून हिंगणघाट शहरातील नागरिक महिला सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दबाव निर्माण झाला आणि हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला. मग सुरू झाली श्रेय घेण्याची लढाई आणि सुरू झाला जागेचा तिढा जो आता पर्यंत सुटला नाही. अगोदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरापासून 14 किलोमिटर दूर असलेल्या वेळा येथील बँकेचा आणि शासनाचा शेकडो कोटीचा बोजा असलेल्या खाजगी जागेवर पळवून नेण्याचा मनसुबा रचला गेला होता. वेळीच हे संघर्ष समिती आणि नागरिकाच्या लक्षात आल्याने तो मनसुबा हाणून पाडण्यासाठी मोठे जन आंदोलन करण्यात आले आणि तो घाट हिंगणघाट शहरातील नागरिकांनी हाणून पाडला. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी याचे पितळ उघडे पाडले असे हिंगणघाट करांची भावना दिसून आली होती.
करोना महामारीच्या भयंकर काळात हिंगणघाट तालुक्यात सर्वत्र करोना रुग्णाची त्राही त्राही होत असताना हिंगणघाट येथे रूग्णांसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या फंडातून हिंगणघाट तालुक्यातील करोना रूग्णांसाठी अगदी वाजवी दरात उपचार व्हावे म्हणून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले होते. मिळालेले हे व्हेंटिलेटर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात लावण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी नकरता ते हिंगणघाट शहरातील खाजगी रुग्णालयाला देण्यात आले आणि अशा प्रकारे हिंगणघाट तालुक्यातील रूग्णांसाठी आलेल्या व्हेंटिलेटर पासून खाजगी रुग्णालयाने लाखों रुपये कमावले. अशा प्रकारे करोना महामारीच्या काळात हिंगणघाट तालुक्यातील रूग्णांना वाऱ्यावर सोडून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आपल्या खाजगी डॉक्टर मित्रांना लाभ मिळवून दिला. परत लोकप्रतिनिधी तसाच लाभ हिंगणघाट येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट पासून दूर नेऊन आपले मित्र असलेल्या खाजगी डॉक्टरांचा देण्याचा उद्देश तर नाही ना? त्या मुळे स्थानिक लोकप्रतिनिधी हा सर्व आटापिटा सुरू करून हिंगणघाट प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जागेची निश्चिती साठी आलेल्या मेडिकल टीमला समुद्रपुर तालुक्यातील जाम, हिंगणघाट पासून दूर असलेल्या कुटकी जवळील जागा दाखविण्यात आली. त्यामुळे हिंगणघाट शहरातील नागरिकाच्या वतीने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट साठी मंजूर करण्यात आले. ते हिंगणघाट शहरापासून दूर नेण्याचा अट्टाहास करण्यात येत आहे. हा हिंगणघाट शहरातील मतदारांना लोकप्रतिनिधी यांनी दिलेला एक प्रकारे धोका आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा लोकांना मतदार त्यांची जागा दाखवून देणार अशी चर्चा संपूर्ण हिंगणघाट शहरात रंगली आहे.