प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पुलगाव-शिरपूर रोड दुरुस्तीच्या मागणी बद्दल पुलगाव येथील युवा संघर्ष मोर्चाच्या द्वारे बांधकाम विभाग कार्यालय पुलगाव येथे डेप्युटी इंजिनिअर यांना दिं. 22 ऑगस्ट ला निवेदन देण्यात आले होते. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे व शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी 1 तास रस्त्याची समस्यांच्या अडचणी समजून सांगितला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला येत्या आठ दिवसाच्या आत कामला सुरुवात न केल्यास आम्ही आंदोलन करू अशा ईशारा यावेळी देण्यात आला होता. यावेळी लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते.
युवा संघर्ष मोर्चाच्या निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनच दिवसातच भर पावसात कामाला सुरुवात केल्याने युवा संघर्ष मोर्चाच्या कार्याला यश आले आहे. किरण ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ह्या कामाला यश मिळालं, आज पुलगाव-शिरपूर रस्ताचे काम सुरु झाले असे मत गावातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.