उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा पदाधिकारी व सांगली जिल्हातील चारही तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व सांगली जिल्हा निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे, जिल्हा महासचिव राजू मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वंचित बहुजन आघाडीची ही बैठक संपन्न झाली.
येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडी ही सर्व मतदार संघामध्ये उमेदवार देऊन ताकतीने लढवण्याची तयारी करत आहे असे सूचना पदाधिकारी यांना देण्यात आल्या. उमेदवार निश्चित करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व ओबीसी संघटनांमध्ये इतर विविध समविचारी पक्षांमध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी चर्चा करून उमेदवार निश्चित करण्याचे आदेश देखील वरिष्ठाकडून देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व तालुक्याचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष शहराध्यक्ष सचिव आधी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

