✒️जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव:- जील्हातील मुक्ताईनगरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी फजीयेत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेते कटाक्ष करत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच नागरिक सभेतून उठून जायला लागले. लोक निघून जात असल्याचं पाहून गुलाबराव पाटील यांनी सुरू असलेलं भाषण थांबवलं. भाजपा नेते गिरीश महाजन यांनाही कार्यकर्ते निघून जात असल्यामुळे भाषण थांबवाव लागलं. गिरीश महाजन यांनीही जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली. पण कार्यकर्ते काही थांबायला तयार झाले नाही. मुख्यंमत्र्याच्या सभेची फजीयेत बघून गिरीश महाजन म्हणाले वेळ फार कमी आहे. आमच्या माता भगिनींना घरी जायचं आहे, त्यांची चलबिचल दिसत आहे. त्यामुळे गुलाबरावांनी भाषण आटोपतं घेतलं, मी पण आटोपतं घेतो.
प्रमुख नेत्यांनी भाषण आटोपतं घेतल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली. ‘इथे आणणलेली माणसं भाड्याने आणलेली नाहीत. अपक्ष आमदार असतानाही इतका जनसमुदाय आला आहे,’ असं एकनाथ शिंदे भाषणाच्या सुरूवातीलाच म्हणाले. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला.