बदलापूर शहरात चिमुकल्या मुली वर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध रॅली.
नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मारेगाव:- बदलापूर शहरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व पश्चिम बंगाल मधील कोलकात्यातील एका रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्यात राज्यात वेगवेगळ्या भागात अजून ही महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असून महिला आणि मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज मारेगाव येथे 10 वीत शिकणाऱ्या मुलींनी या घटनेचा जाहीर निषेध करून निषेध रॅली काढली.
राज्यात आणि देशात महिला आणि मुलीवर वाढते अत्याचार विरोधात १० वीच्या विद्यार्थिनी कु. सणा इसाक शेख, कु. सानिया कृष्णा मेश्राम, कु. चैताली पाडूरंग वरारकर, कु. मिताली विलास पोटे या विद्यार्थिनी मारेगाव तालुक्यात निषेध रॅली काढली. त्या मद्ये मारेगाव तालुक्यातील महिला, मुली या रॅली मोठ्या प्रमाणात शामिल झाल्या होत्या.
यावेळी या विद्यार्थिनीचे म्हणणे होते की, आपण “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे”, शपथ घेत प्रतिज्ञा म्हणतो आणि तरी सुद्धा असे लैंगिक अत्याचाराचे बलात्कार चे प्रकार आपल्या शुरांच्या, वीरांच्या, क्रातिकारकांच्या पावन भूमीत घडत असेल तर हे अशोभनीय राक्षसी कृत्य आहे, त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून अशे निवेदन मारेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले.