रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- तालुक्यातील कोकाटे हादगाव सर्कल मधील को – हादगावातील युवकांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज परतुर येथील शिवसेना जिल्हा कार्यालय येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे अग्रवाल यांनी हादगाव येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला.
या पक्ष प्रवेश वेळी अग्रवाल यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार व आनंद दिघे यांची शिकवण हे खऱ्या अर्थाने याचा प्रसार प्रचार गावागावात झाला पाहिजे व गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करावा आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊदेणार नाही आशि या ठिकाणी ग्वाही देतो व आपण शासनाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत आपण पोहोचवावे असेही शेवटी अग्रवाल यांनी सांगितले.यावेळी शिवसेना वैद्यकीय सहायता निधी प्रमुख कैलास चव्हाण, दीपक हिवाळे उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश करणाऱ्या मध्ये सुरेश दगडू चव्हाण, राम राठोड, राजेशभाऊ श्रीराम चव्हाण, महादेव छगन चव्हाण, राम राठोड, ,राजूभाऊ चव्हाण,नारायण राठोड, आकश चव्हाण,अंकुश राठोड.सुनील चव्हाण, काळू राठोड,विलास राठोड, महादेव चव्हाण, पिंटू चव्हाण, नामदेव चव्हाण, सुभाष चव्हाण, लहू राठोड, भरू राठोड, भाऊ राठोड, विनोद राठोड, शिवाजी राठोड हे सर्व उपस्थित होते.

