हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे. त्यात पोलिसांनी एका गांजा विकणाऱ्या महिलेला अटक केल्याने बल्लारपूर हे गांजा खरेदी- विक्रीचे केंद्र तर नाही ना? अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगारापुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. त्यात बल्लारपुर पोलीसांनी आज २६ ऑगस्ट रोजी गांजा विक्री करण्याच्या महिलेवर धडक कार्यवाही करण्यात तिला बेड्या ठोकल्या असल्याने या गांजा विक्रीचा भांडाफोड केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास बल्लारपूर पोलिसांना मुखबिरने माहिती दिली की, राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर येथे राहणारी शमशाद रिजवान शेख हिचे घराची अंमली पदार्थ (गांजा) बाळगुण असुन तसेच गांजाची अवैध्य विक्री करित आहे. त्या अनुषंगाने दोन शासकीय पंच, फोटोग्रॉफर, व्यवसायीक यांना पोलीस ठाणे बल्लारपुर येथे बोलावुन सदर खबरेबाबत थोडक्यात माहिती देवुन मुखबिरने सांगितल्याप्रमाणे घटनास्थळावर रवाना होवुन नमुद महिलेच्या घराची झडती घेतली असता. तिचे घरातुन अंमली पदार्थ (गांजा) मिळुन आला.
या झडती दरम्यान पोलिसांना एका अब्बा हुजुर असे लिहलेल्या प्लॉस्टीक चुंगडीत ओलसर हिरवट रंगाचा (गांजा) ज्याचे वजन ८.०३५ किलो ग्रॅम किंमत 80 हजार रुपये मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीत महिला नामे शमशाद रिजवान शेख वय ३५ वर्षे राह. केजीएन चौक, राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपुर हिला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तिला गांजा आणुन देणारी महिला नामे बदकम्मा ऊर्फ बदकी नुनावत रा.ह.मु. वरंगल राज्य- आंधप्रदेश, मुळ पत्ता- शिवनगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर हिचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनिल वि. गाडे, पोउपनि. हुसेन शहा, मपोउपनि. वर्षा नैताम, सफौ. गजानन डोईफोडे, सफौ. वामन शेंन्डे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. रणविजय ठाकुर, बाबा नैताम, मपोहवा. अनिता मोहुर्ले, शरदचंद्र कारुष, विकास जुमनाके, शेखर माथनकर, प्रकाश मडावी, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. कल्याणी पाटील, विना येलपुलवार इ. स्टॉफ यांनी केली आहे.