प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- मौजा छिंदवाडी कडून आर्वी कडे मोटर सायकलने गावठी मोहा दारूची वाहतूक होत असल्याबाबत मुखबीर कडून माहिती मिळाल्यावर आर्वी- देऊरवाडा रोडवरील मोहन रेस्टॉरंट समोर नाकाबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी क्रमांक 1) उमेश रामराव जाधव वय 23 वर्ष राहणार शिंदवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती याचे ताब्यातून एका रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 60 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 12000 चा व रबरी ट्यूब किंमत 400 रुपये एक जुनी वापरते पांढ-या रंगाची सुझुकी कंपनीची एसेस मोपेड गाडी क्र MH 27 AP 9778 किंमत 60000 रुपये असा जुमला किंमत 72400 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
आरोपी क्रमांक 2) प्रणय रामपाल काळे वय 19 वर्ष राहणार शिदवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांचे ताब्यातून एका रबरी ट्युबमध्ये 60 लिटर गावठी मोहा दारु, प्रती लिटर 200 रुपये प्रमाने 12000 हजार रुपये व एक जुनी वापरती बजाचे कंपनीची पल्सर मोटर सायकल क्रमांक MH 27 AM 0998 किमंत 65000 रुपये व रबरी ट्युब, 400 रुपये असा जुमला किमंत 77,400 रुपये किमतीचा माल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने वरील आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस देवराव खंडेराव, पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांचे मार्गदर्शनात पोहवा रामकिसन कासदेकर, पोहवा दिगंबर रुईकर, पोशी राहुल देशमुख, स्वप्निल निकोरे, निलेश करडे आदींनी केली.

