मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज दिनांक २७ ऑगस्ट रोज मंगळवारला शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमुख सतीश धोबे, मनीष देवडे, सिताराम भुते यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना
तहसीलदार समुद्रपूर यांनी शासनाच्या विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभ मंजुरीच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांचे प्रमाणपत्र दिनांक 19 ऑगस्ट 2024 च्या झालेल्या तहसीलदार यांच्या समितीच्या सभेत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना वितरित करणाऱ्या प्रमाणपत्रा वरील या योजनेचे अध्यक्ष आमदार समीर कुणावार यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. त्यावर शासनाचा लोगो व राजमुद्रा प्रकाशित करण्यात आली आहे. सदर प्रमाणपत्रावरील प्रकाशित केलेले छायाचित्र हे कुठल्या नियमात बसते, यावर आपल्या विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात यावे ! याकरिता निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे हिंगणघाट येथील इमारत बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने मिळणारा किचन सेट व सुरक्षा पेटी मिळत असताना त्या ठिकाणी सुद्धा आमदार समीर कुणावर यांनी स्वतःचे फोटो व स्वतःच्या नावाचे स्टिकर व टोकनवर त्यांचा फोटो असलेले टोकन वितरित करण्यात आले. ते सुद्धा नियमात बसत नसतानाही प्रशासनाने या संदर्भात आजच्या तारखेपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. वरील सर्व विषय जर नियमात बसत असेल तर, आमची व आमच्या पक्षाची कुठलीही हरकत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम कामगार गोरगरीब व गरजू लोकांच्या उत्थानाकरिता अशा योजना निर्माण केल्या. परंतु या योजनेला लोकांपर्यंत पोचविण्याचे काम शासनाचे असताना, परंतु शासन मात्र यात कुठेही दिसत नाही. स्थानिक आमदार समीर कुणावार हे आपल्या पद्धतीने प्रशासनावर दबाव टाकून या योजनेचा लाभ स्वतःला मतदानातून कसा होईल यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असताना या कृत्याबाबत आपल्याकडून (प्रशासन) कुठली कारवाई केलेली दिसून आली नाही आणि म्हणून या संदर्भात आपल्या कडून लेखी स्वरुपात शासनाचे म्हणे आम्हास कळवावे.
शैक्षणिक पात्रतेच्या नुसार एखादा लोकप्रतिनिधीला शासनाचे नियम पाळत येत नसेल किंवा त्यांना कळत नसेल तर, आम्ही समजू शकतो. परंतु आपल्या विभागातील सर्व अधिकारी, शासकीय परीक्षा उत्तीर्ण करून असल्यावर सुद्धा त्यांच्या सदर विषय लक्षात का आला नाही ? म्हणून आमची आपणास विनंती आहे की, संबंधित विषयावर आपण कोणती कार्यवाही करणार ? याबद्दल सविस्तर लेखी माहिती द्यावी. अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली.
या संदर्भात निवेदन देण्याकरिता पक्षाचे उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाणे, मनोज वरघणे, शंकर मोहमारे, गजानन काटवले, भास्कर ठवरे, अनंता गलांडे, आशिष जयस्वाल, चंदू भुते, प्रशांत सुपारे,नितीन वैद्य, दिलीप वैद्य, फिरोज खान, फारुख खान, पप्पू घवघवे, अमोल वादाफळे, आशिष वाघ, शंकर भोंमले, दिनेश धोबे, संजय सोनुरकर, नथुजी कुकडे, आकाश सुरकार, गणेश ढेकले इत्यादी शिवसैनिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.