जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शालेय कबड्डीतील विजयी मुलींच्या संघाला मिळाला हंडी फोडण्याचा मान. आदर्श शाळा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा संयुक्त उपक्रम.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजूरा 27 ऑगस्ट:- आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा तथा आदर्श हायस्कुल व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने गोकुळाष्टमी निमित्य वृक्ष बियांची दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जानभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, गाईड कॅपटन रोशनी कांबळे, इको क्लब प्रमुख जयश्री धोटे, कब बुलबुल युनिट लीडर अर्चना मारोटकर, सुनीता कोरडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स, कब बुलबुल च्या विध्यार्थीनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
श्रीकृष्णच्या प्रतिमेचे पूजन करून राधा कृष्णाच्या वेशभूषेतील विध्यार्थीच्या उपस्थितीमधे ही वृक्ष बियांची दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान चौदा व सतरा वयोगटातील जिल्हा स्तरावर निवड झालेल्या मुलींच्या संघाला मिळाला. या वृक्षबीयांची हंडी फोडल्यावर खाली पडेल्या बियांचे संकलन करून उन्हाळ्यात याचे सिडबॉल तयार केले जातात आणी पावसाळा लागला की तेच सिडबॉल रोपण केले जातात. यावर्षी मुलींनी दहीहांडी फोडून स्त्री पुरुष समानतेचा संदेश सुद्धा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड कॅपटण रोशनी कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर यांनी केले. तर आभार जयश्री धोटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका वैशाली टिपले, रजनी पिदूरकर, प्राजक्ता साळवे, वैशाली चिमुरकर, मनीषा लोढे, माधुरी रणदिवे, किसन वेडमे, आदर्श हायस्कुलचे नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, भाग्यश्री क्षीरसागर, आशा बोबडे, विकास बावणे, अंजली कोंगरे आदींसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा यांचे सहकार्य लाभले.