प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मुस्लिम धर्माचे धर्म गुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या. या कारणाने रामगिरी महाराज यांच्या विरोधात पोलिस तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुध्दा त्यांना अटक न केल्यामुळे यांच्या अटकेच्या मागणी करीता एआयएमआयएम चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला मालारर्पण व अभिवादन करुन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
राज्यात महायुतीचे शिंदे – फडणवीस सरकार जाणीव पुर्वक धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या महाराजांची पाठ राखण करत असल्याचे निदर्शनास येत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाज या वक्तव्याचा निषेधार्थ रस्त्यावर उतरला असताना संविधानिक मार्गाने कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन कारण निवेदन सादर करण्यात आले. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आजही आम्ही संविधानिक मार्गाचा अवलंब करून जो पर्यंत रामगिरी महाराज यांना अटक होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेऊ. असा इशारा आसिफ खान यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला असल्याचे आसिफ खान यांनी आपल्या प्रतिक्रियेतुन व्यक्त केले.