उपसरपंच संजय अलोने यांच्या कडूनही मदतीचा हात.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- महागाव बुज येथील सुरेश चिन्ना आत्राम यांच्या पोटात अचानकपणे दुखने सुरू झाले असता तातडीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तब्येतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना गडचिरोली सामान्य रूग्णालय येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण उपचार सुरू असतांना रात्री 12.00 वाजताच्या त्यांची प्राणज्योत मावळली.
यावेळी मृतकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थीती फारच हालाखीची असल्याने त्याच्या नातेवाईकाकडे पैसे नव्हते गडचिरोली वरून त्यांचा मृत्यूदेह अंतिम संस्कार करण्या करिता आपल्या गावी न्यायचा कसा यात कुटुंब चिंतेत दुबले होते. या प्रकरणाची गंभिरता लक्षात घेऊन गावातील उपसरपंच संजय अलोने यांनी राजे अम्ब्रिशराव यांना मोबाईल वरून प्रकरण कळताच तेव्हा तात्काळ मदत म्हणून साई झाडे यांच्या कडे शववाहीकेला देण्यासाठी ५००० हजार रुपये दिले व उपसरपंच संजय अलोने यांच्या कडून ५००० हजार रुपये मृत सुरेश आत्राम यांच्या परिवारास आर्थिक मदत म्हणून देण्यात आले.
यावेळी रविभाऊ नेलकुद्री सदस्य दिपाली कांबळे, सदस्य लालू वेलादी, सरपंच पुष्पा मडावी, मदना वेलादी, शेका पानेम, सत्यन्ना पेंडलीवार, सुरेश वेलादी, संजय टेकूल, विनोद जिल्लेवार, अन्वेष गड्डेवार, राकेश कोसरे उपस्थित होते