रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मधील मुलांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून त्यांनी ‘गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो…’ गाण्यावर ठेका धरला. यावेळी बालगोपालांनी मनोरे रचून जल्लोषात दहीहंडी फोडून प्रसादाचे वाटप केले.गोप- गोपिकांच्या वेशभूषेत विद्यार्थी खूप सुंदर दिसत होते. यावेळी बालगोपालांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार व सचिव मीनाक्षी काळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शनामध्ये त्या म्हणाल्या की हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्णांना लहानपणी पांढरे लोणी, दही आणि दूध खायला खूप आवडत होते. त्यासाठी श्रीकृष्ण स्वतःच्या घरातून, मित्रांसह शेजारी व इतर ग्रामस्थांकडूनही दही, दूध, लोणी चोरून आणत असत. त्यामुळे त्यांची अजूनही काही नावं पडली. जशी की, “नवनीत चोर” किंवा “माखन चोर” असेही म्हणतात. मुलांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपमुख्याध्यापक अरुण चंदणे, ज्योती खैरे, व्यवस्थापक पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिल्हारे, शिक्षक वृंदामध्ये श्याम चव्हाण, वैष्णवी तनपुरे, रोहिणी किंगरे, सुरज पहाडे, नागेश क्षीरसागर, महानंदा व्यवहारे, साधना पाईकराव, मीना मसलेकर, अश्विनी यंदे यांनी अथक परिश्रम घेतले.

