मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिरीष नानाजी गंधारे यांना त्यांच्या कोविडविषयक संशोधनाशी संबंधीत असलेल्या ‘डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क फोर मेंटेनन्स टास्क ऑफ मेडिकल इक्विपमेंट युसिंग फेल्युअर मोड अँड इफेक्ट एनालिसीस” या विषयांतर्गत डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पीएचडी पदवी व्हिआयीटी, जयपूर येथून प्रदान झाली.
शिरीष नानाजी गंधारे यांनी आपले संशोधन कार्य आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी संलग्नित दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ, वर्धा येथे कोविड काळांतर्गत २०२०ला सुरु केले होते. त्यांना या कार्याकरिता त्यांचे सुपरवायझर डॉ प्रमोद कुमार, व्हीआयटी, जयपूर व डॉ टी मदनकर, रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेण्ट, नागपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचे परीक्षण डॉ कुलदीप सांगवान, बिट्स, पिलानी व डॉ राजीव अग्रवाल, एमेनाईटी जयपूर यांनी या विषयासंदर्भात कार्य केल्याबद्दल अभिनंदन केले. या विषयातील संशोधनाने वैधकीय उपकरणाची उत्तम प्रकारे उपलबद्धता करण्यास मदत होते.
प्रा शिरीष गंधारे यांनी आपल्या संशोधन सहकार्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, दत्ता मेघे संस्था यांचे आभार मानले. ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील (गंधारे गुरुजी), स्नुषा सौ. सुप्रिया (नरड) (विभाग प्रमुख, अलायड सायन्स, दत्ता मेघे संस्था)मुलगा यथार्थ तसेच शिंदे परिवार व आप्तस्वकीयांना देतात.