प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या. या कारणाने रामगिरी महाराज यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्यात किमान 38 पोलिस तक्रारी दाखल झाल्या. या आधारे रामगिरी महाराज गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल झाल्या नंतर सुध्दा त्यांना अटक न केल्यामुळे यांच्या अटकेच्या मागणी करीता एआयएमआयएम चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला मालारर्पण व अभिवादन करुन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.
महायुतीचे शिंदे – फडणवीस सरकार जाणीव पुर्वक धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांची पाठ राखण करत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे एआयएमआयएम चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान यांनी म्हटले आहे. आज उपोषण मंडपाला आप चे व महाविकास आघाडीचे नेते मंडळी सह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन आसिफ खान यांच्या उपोषणाला समर्थन जाहीर केले.
देशात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. महाराष्ट्रतील हिंदु-मुस्लिम एक्य धोक्यात आणणारे रामगिरी महाराज सारखे व्यक्ती जाणीव पुर्वक असे वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करत आहे. असे असताना सुधा रामगिरी महाराज यांना पोलीस प्रशासना कडून जर अटक होत नाही याचा अर्थ असा की राज्य सरकार ह्या रामगिरी महाराज यांना पाठीशी घालत आहे. संविधानिक मार्गाचा अवलंब करून जो पर्यंत रामगिरी महाराज यांना अटक होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेऊ. असा इशारा आसिफ खान यांनी प्रशासनाला दिला.