हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते नोकरीचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार केल्याची घटना सिंदेवाडी येथून समोर आली आहे. यावेळी तरुणीच्या तक्रारीवरुन सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश टेंभूर्णे वय 35 वर्ष असे संशयित आरोपीचे नाव असून तो पसार झाला आहे. आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
पीडित मुलगी ही सिंदेवाही येथे आपल्या वडीला बरोबर राहत असून बुधवारी दि.28 ऑगस्ट रोजी पिढीत मुलगी घरी न आल्याने कुटुंबियानी सर्वत्र मुलीचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यानंतर वडिलांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली. पण दुसऱ्या दिवशी पिढीत मुलीने आपल्या वडिलांना फोन करून सांगितले की, मी उमरेड येथे असून मला येथून घेवून जावे. यानंतर वडील उमरेड येथे जावून तिला घेवून आले. यानंतर तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार घरी आल्यानंतर आई वडिलांना सांगितला. त्यानंतर तरुणी व तिचे आई वडील पोलिस स्टेशन येथे जावून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दि.28 ऑगस्ट रोजी संशयित आरोपी आकाश टेंभूर्णे याने तरुणीला संगणक क्षेत्रात नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले होते. यानंतर आकाश तिला उमरेडला घेवून गेला. तेथे नेवून त्याने तरुणीवर एका लॉजमध्ये अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनंतर तक्रार दाखल करून सिंदेवाही पोलिसांत संशयीत आरोपी आकाश टेंभूर्णे यांचे विरोधात तक्रार दाखल केली. मात्र आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.