शेतकरी संघटना: ॲड. प्रफुल आस्वले जिल्हा उपाध्यक्षपदी; तर रामकृष्ण सांगळे तालुका अध्यक्षपदी.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत ॲड. प्रफुल आस्वले जिल्हा उपाध्यक्षपदी; तर रामकृष्ण सांगळे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त सदस्यांचा सत्कार सेवानिवृत्त गटविकास अधिकारी शालीकराव मावलीकर व युवा अधिवक्ता दीपक चटप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शेषराव बोंडे, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, तोहगाव उपसरपंच मदन खामणकर, विठ्ठलवाडा सरपंच अंकुर मल्लेलवार, मालन दुर्गे, मारोती भोयर, मदन खाडे, चौथाले, मीराबाई कोरडे, मारोतराव चौधरी आदी उपस्थित होते.

