उपविभागीय अधिकारी पेपरमील प्रशासनाला जनहिताच्या प्रश्नावर उत्तर देण्यास भाग पाडा” अन्यथा आपल्या कार्यालयापुढे आम्ही ठिय्या मांडू: आम आदमी पार्टी
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात सततचे वन्यजीव हल्ले होत असतांना मागील काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष पेपरमील लकडा स्टाॅक यार्ड च्या संदर्भात आक्रमक भुमिकेत आहे. शहरात होणाऱ्या प्राणीहल्ल्यांसाठी शहराच्या नागरीवस्ती लगत असलेला हा स्टाॅक यार्ड मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे आम आदमी पक्षाचे मत आहे. यापूर्वी अनेकदा याविषयावर पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीत आम आदमी पक्ष व पेपरमील प्रशासनाची बैठक झाली व या बैठकांमध्ये पक्षाने जनतेचे आरोग्य व जीवनाशी संबंधित काही लेखी प्रश्न पेपरमील प्रशासनाला दिले होते आणि त्या प्रश्नांचे लेखी उत्तरे पक्षातर्फे मागण्यात आले परंतु या प्रश्नांबाबत उपविभागीय अधिकारी तसेच पेपरमील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांशी विचारपूस केली तरीही पेपरमील प्रशासन व उपविभागीय अधिकाऱ्यांची देखील विषयाबाबत गांभीर्यता दिसून आली नाही तेव्हा शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या निर्देशानुसार शहर संघठनमंत्री रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वात पुन्हा एक पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यामध्ये जर येत्या 8 दिवसांत स्टाॅक यार्ड, प्रदूषण, सीएसआर फंड यासारख्या विषयाबाबत पेपरमील मील प्रशासनाला उत्तर देण्यास भाग पाडले नाही तर आम आदमी पक्ष उपविभागीय अधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. यावेळेस शहर सचिव ज्योति बाबरे, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, मनिषा अकोले, अल्पसंख्याक शहराध्यक्ष असलम शेख, गणेश अकोले, ज्योती तोडेकर, सरमन बन्सल उपस्थित होते.