श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- भारतीय संस्कृतीमध्ये बैलाचे फार मोठे महत्त्व आहे श्रावण महिन्यात कृषी संस्कृतीचे भरपूर सण साजरे केले जातात. श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून बैल पोळा सण ओळखला जातो.आपला देश कृषीप्रधान असून, शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्वच शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील कामासाठी मोठी मदत होते. महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्था अंतर्गत असणाऱ्या आदित्य कृषि महाविद्यालय बीड येथे श्रावण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषि प्रधान भारतीय संस्कृतीत शेतकऱ्यांच्या बरोबरीने बैल रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतात म्हणून वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळा साजरा केला जातो असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्या तसेच आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान बैलांचे पूजन आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कल्याण आपेट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेंद्रिय शेती मध्ये पशुधनाचे कशाप्रकारे अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच सद्यस्थितीत पशुधन वाढवणे का गरजेचे आहे यावर मा. प्राचार्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अतिथी म्हणून मा. गिरीषजी गिल्डा साहेब, इंजि. श्याम भुतडा सर, डॉ. सतीश कचरे सर, डॉ. अमोल सानप सर इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय बैल पोळा सणाचे व्हिडिओ तयार करणे स्पर्धा आदित्य कृषि महाविद्यालया द्वारे आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी आदित्य कृषि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.