हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात एका अल्पवयीन मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. आरोपी ने त्या मुलीला जबरदस्तीने लॉज वर नेऊन तिच्या सोबत लैंगिक शोषण केले. या प्रकरणी मुलीच्या आत्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी 19 वर्षीय शिवम दिनेश दुपारे रा. मौलाना आझाद वॉर्ड याला अटक केले आहे.
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोपी विरुध्द पॉस्को ४ (१) व बीएनएस २०२३ ६४ (१) कलम अंतर्गत कारवाई केले आहे. सदर प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने मानसिक तणावातून आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने शहरात खळबळ माजली आहे.
लोकांची ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले होते. तिच्या शवला शवविच्छेदना करीता चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या प्रकरण विषयी अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे घरी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी सांगितले की पोलीस बारकाई ने तपास करीत असून शांती लॉज चे मालक व व्यवस्थापक वर कारवाई करण्यात येईल.