ओयो हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करून बेकायदेशीर ओयो हॉटेल्सला सील ठोकण्यात यावे: पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर
हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- उडिसाच्या रितेश अग्रवाल यांनी 2013 मध्ये स्थापित केलेले ओयो हॉटेल चे भारतभर स्थापत्य झाले. हजारो ओयो ची सरकारी ठायी नोंदही झाली. मात्र नियमांची ऐशी तैशी करून गल्ली बोळात बुजगावण्या सारखे निर्माण होणारे ओयो हे कापल्स ला शरीरसुख भोगण्यासाठीचे अड्डे बनले आहे. परिणामता फक्त नफा कमविण्याच्या उद्देश असल्याने ओयो संचालक मूळ कागद पत्रांची पृष्टी न करता रूम देतात. ज्यात काही अल्पवयीन मुली बळी पडतात. त्यामुळे जिल्यातील सर्वच ओयो हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करून बेकायदेशीर ओयो हॉटेल्स ला सील ठोकण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
बल्लारपूरार नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे. ओयो संचालकाच्या अक्षम्य चुकीमुळे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणी बदनामीमुळे या पीडित मुलीला आत्महत्या करून तिला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे हॉटेलच्या अशा बेकायदेशीर कारवायामुळे शहरात पुढे पण अशा बलात्काराचा घटना घडू शकतात त्यामुळे अशा हॉटेलवर आळा बसला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातिल अनेक शहरात हे ओयो हॉटेल्स गल्ली बोळात उभारले गेले याची परवानगी घेण्यात आली आहे का? याची संबंधित विभागा मार्फत कायदेशीर चौकशी होणे महत्वाचे आहे. कारण बल्लारपूर येथील घटना उघडकीस आल्या नंतर इतर हॉटेल्स मध्ये असले प्रकार घडत नसतील, हे कशावरून? असा प्रश्न सोनारकर यांनी उपस्थित केला आहे. या संबंधाने पुरोगामी पत्रकार संघाचे एक शिष्ट मंडळ लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आज राज्यातच नव्हे देशात वासनाअंधांनी कळस गाठला आहे. आई,बहिणी सह 4- 5 वर्षाच्या चिमूरड्या ही सुरक्षित नाही. अशा भिषण अवस्थेत पोलीस विभाग, पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणी जागरूक नागरिकांनी अशा घटनेला लगाम लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही आवाहन पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी केले आहे.