Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार हिंगणघाट येथील दिपाली सावंत यांना जाहीर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 5, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार हिंगणघाट येथील दिपाली सावंत यांना जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात हिंगणघाट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षीका असलेल्या दिपाली सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आल्याने तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आज जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक आपल्या मुलांना शिकवत नाही कारण सगळीकडे आज कॉन्व्हेन्ट संस्कृती फोफावत चालली आहे आणि या शाळेत शिकून मुल आजच्या स्पर्धात्मक युगात टिकू शकेल की नाही ही शंका पालकांच्या मनात आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था, फाटलेले छप्पर, शिक्षकांचं वेळ काढू धोरण या बद्दल देखील पालक वर्गात अस्वस्थता असल्याकारणाने लोक मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकत नाही, पाठ फिरवतात पण असेही काही शिक्षक आहेत की जे स्वतःच्या कल्पकतेने शिक्षणात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता ठेवतात आणि परिस्थितीवर मात करून एक नवीन आदर्श समाजासमोर उभा करतात. सौ. दिपाली सावंत हे असेच एक नाव ज्यांनी शालेय शिक्षनासोबत माणूस घडविण्याचे शिक्षण दिलं, येणाऱ्या स्पर्धात्मक युगात येणाऱ्या अडी अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य बाल मनाला दिलं, शिक्षणासोबत मुलांना आवड निर्माण करून माणूस घडवणार शिक्षण देण्याची त्यांची वृत्ती त्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीची आज राज्य स्तरावर दखल घेतली गेली. महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना घोषित झाला. येत्या ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांना हा पुरस्कार प्रदान केल्या जाणार आहे.

सौ. दिपाली सावंत यांची 2006 साली शिक्षण सेवक म्हणून कर्तव्यावर रुजू होऊन हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही येथील शाळेत त्यांची पहिली नियुक्ती झाली. यावेळी त्यांनी आपल्या कल्पकतेने त्यांनी शाळेत आणि तेथील परिसरात आमूलाग्र बदल घडविला त्याची दखल तत्कालीन उपजिल्हाधिकारी आणी जिल्हाधिकारी यांनी घेतली सोबतच शाळेला भेट देऊन नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या.

सौ. दिपाली सावंत यांच्या वडिलांचं छत्र हरपल त्यानंतर त्यांच्या आईने हिम्मत्त दिली पुढील शिक्षण सेवकाच शिक्षण पूर्ण केलं, एका सधन परिवारात लग्न झालं परिवारात नौकरी करायची नाही असा शिरस्ता असून देखील परिवारातील सदस्यांना तयार केलं आणि शिक्षक सेवक म्हणून सेवेत दाखल झाल्या आणि अद्यापनाच कार्य सुरू केलं यात त्यांच्या परीवाराच योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे.

सधन परिवारात असून देखील, शिक्षण क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याचा ध्येयाने झपाटलेल्या या मुलीने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून दाखवला. त्यांच्या शिकविण्याची पद्धत, शिक्षणाप्रती त्यांना असलेली आपुलकी यामुळे इथपर्यंतचा टप्पा गाठणे त्यांना सहज शक्य झालं.

रक्षाबंधनाला बोलता बोलता त्यांना कुणी तरी सहज म्हंटले ताई तुमच्या या कामाची दखल राज्य पातळीवर व्हायला पाहिजे त्यावर त्यांचं उत्तर होत आपले काम आपण करत राहायचं कोणी दखल घेवो की न घेवो आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचं. शिक्षनाप्रती त्यांची असलेली आसक्ती या एका त्यांच्या वाक्यातून जाणवली. तन्मयतेने, कर्तव्य समजून एकाग्रतेने ते काम केल्यास यश नक्की मिळते आणि त्याचा सन्मान सुद्धा होतो ते काम कुठलेही असो त्यात ते काम समाज घडवण्याचं असेल तर तिथे काम करण्याला जास्त वाव असतो.

अशीच एक आपल्यातीलच पणं वेगळेपण जपणारी आपली भगिनी दिपाली सावंत. आपल्या शिक्षकी कर्तव्यावर असताना त्यांनी खरया अर्थाने समाज घडवण्याचं काम केलं, शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना बाल मनावर योग्य संस्कार व्हावे येणाऱ्या आयुष्यातील अडीअडचणीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी या उद्दात्त हेतूने त्यांनी शिक्षणा सोबत संस्कार सुद्धा पेरले आणि उद्याची पिढी घडवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. काल सायंकाळी जेव्हा ही बातमी आली तेव्हा खरच वाटल की . एका कर्तृत्वाचा सन्मान होते आहे. सौ दिपाली सतीश सावंत यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Tags: महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार हिंगणघाट येथील दिपाली सावंत यांना जाहीर.वर्धा जिल्हाशिक्षीका दिपाली सावंतहिंगणघाट
Previous Post

गडचिरोली जिल्हात दोन मुलांचा मृत्यू, शववाहीका नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट.

Next Post

OYO हॉटेल मध्ये चालतात काळे कारनामे, चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
OYO हॉटेल मध्ये चालतात काळे कारनामे, चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करा.

OYO हॉटेल मध्ये चालतात काळे कारनामे, चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In