विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- गडचिरोली जिल्हात शिवसेना उबाठा पक्षात सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मनीष दुर्गे यांनी आज आपल्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
मनीष दुर्गे हे मागील 8 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असताना मागील लोकसभा निवडणूक नंतर अहेरी विधानसभा क्षेत्रात पक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षात पाहिजे तसा प्रतिसाद व सहयोग वरिष्ठ नेते कडून मिळाले नसून व सतत वादविवादचा स्तिथी असल्यामुळे तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मागील 5 वर्षांपासून तालुका प्रमुख म्हणून काम करीत असल्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात एटापल्ली येथे चांगलीच पकड निर्माण केला होता. मनिष दुर्गे चा राजीनामामुळे पक्षात मोठा खिंडार पडलं आहे.