हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- बल्लारपूर शहरात रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर येथील नगर परिषद शाळा व शहरातील विविध शाळांमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळा मधील एकूण 136 शिक्षक उपस्थित होते आणि रोटरी टीम आणि रोटरॅक्ट टीमने यावेळी सर्वांना पेन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बल्लारपूर शहरात रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूरचे पदाधिकारी बल्लारपूर तहसील कार्यालय येथील शिक्षण विभागातही गेले यावेळी त्यांचाही सत्कार केला.
शिक्षक दिनाच्या या उत्सव मध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. प्रशांत दोंतुलवार, रोटरी क्लबचे, सचिव रोटे. उत्तम पटेल, आयपीपी रोटे. प्रफुल्ल चरपे, रोटे. कल्पेश पटेल, रोटे. हेमराज गेडाम आणि इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष आरटीआर गौरव पटेल, सचिव आरटीआर रजत परमार, अमोल गांधी, अरविंद डांबरे, देव मेश्राम, मोहित पटेल, अभिषेक गजबे आणि मारिया सोनटक्के यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांच्या स्माईलने आमचा दिवस बनवला कारण आम्ही त्यांचा मेहनतीचा दिवस संस्मरणीय बनवला. आम्ही त्यांच्यासाठी हे सन्माननीय प्रयत्न करू अशी अपेक्षा त्यांना कधीच केली नव्हती. असे मत यावेळी बल्लारपूर शहरात रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूरच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

