मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट:- शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होईल. येते 400 खाटाचे रुग्णालय बांधण्यात येणार अशा घोषणा आश्वासने शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देत आहे. पण प्रश्न हा निर्माण होती की, हिंगणघाट येथील 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय सांभाळायची लायकी नाही मग 400 कशाला? अशा प्रश्न आज निर्माण झाला आहे. कारण शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी रुग्णालयाचा भव्य इमारती बांधल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटेल काय? की त्यांना मिळणाऱ्या सुविधा चांगल्या दिल्याने त्या सुटणार?
हिंगणघाट सारख्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या डौलाने ऊभ्या असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात ‘मला पहा आणि फुले वाहा’ अशीच अवस्था आजच्या तारखेला दिसून येत आहे..
आज दि 5 सप्टेंबरला सुरज दादाजी कुबडे वर्धा जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष हे एका रुग्णाला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात गेले असता यावेळी रुग्णालयाची अवस्था बघीतली सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र दुर्गधी पसरली असून या परिसरात उभे राहणे अशक्य असल्याचे दिसून आले. अन्य नैसर्गिक कामासाठी पाणी तर नव्हतेच परंतु पिण्याचे पाणीही रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे बेहाल झाल्याचे दिसून येत आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील प्रसाधनगृह आणि शौचालय हे मोठ्या प्रमाणात घाणीने भरून असून ‘प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानाला’ हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने काळीमा फासला आहे असे चित्र दिसून येते. प्रसाधनगृह आणि शौचालयाच्या त्या घाणीत शौचास बसण्या पेक्षा काही रुग्णांनी दवाखाण्याच्या मोकळ्या जागेत मध्ये आपले विधी आटोपल्याने घाणीत अधिकच भर पडलेली दिसून आली. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी एकही सफाई कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले. डॉक्टर व अन्य स्टॉफ पुरेशा प्रमाणात नसल्याने याला उपजिल्हा रुग्णालय म्हणावे की ग्रामीण भागातील एखादा छोटासा दवाखाना म्हणावे याविषयीं मनात संभ्रम निर्माण होतं आहे.
हिंगणघाट शहरात 400 खाटाच्या रुग्णालयासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या गवगवा करत आहे. आज 100 खाटाच्या रुग्णालयाची अशी अवस्था आहे तर 400 बेड आल्या नंतर काय अवस्था राहील. यांचा विचार पण न केलेला बरा. कारण गोरगरीब व ग्रामीण जनतेच्या सोयी साठी बांधलेल्या ह्या रुग्णालयाची ही दैन्यावस्था कोणाही लोकप्रतिनिधीला दिसतं नाही हे दुर्दैव येथील मतदार संघांचे आहे. अशा गंभीर आरोप सुरज दादाजी कुबडे वर्धा जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष यांनी लावला आहे.