अनिल अडकिने, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- नुकताच विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका उमरेड तर्फे कलाकारांचा भव्य मेळावा व सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीश भिवगडे यांनी केले. तर प्रमुख अतिथींचे स्वागत अलंकार टेंभुर्णे यांनी केले. नागपूर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख व महाराष्ट्र संदेश न्युजचे प्रधान संपादक पत्रकार युवराज मेश्राम यांचे माजी मंत्री सुनील केदार व माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी शाल, पेन व गुलदस्ता देऊन सत्कार केला.
विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे उमरेड येथे भव्य कलावंताचा मेळावा आयोजित केलेला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मीताई बर्वे, उमरेड नगरपरिषद चे माजी अध्यक्ष गंगाधर रेवतकर, उमरेड पंचायत समितीच्या सभापती गीतांजली नागभीडकर, पंचायत समिती सदस्य प्रियांका लोखंडे, सभापती मिलिंद सुटे, सभापती माधुरी देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ शाहीर कलाकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने, विदर्भ संघटक अरुण सहारे, जिल्हा प्रतिनिधी माया गणोरकर, विदर्भ महिला प्रमुख संगीता भक्ते हे होते.
या मेळाव्यात शाहिरी, भजन मंडळ, नृत्य, गोंधळ मंडळ अश्या एकूण 103 मंडळांनी या मेळाव्यात भाग घेतला. रामभाऊ धनजोडे उमरेड तालुका अध्यक्ष, वासुदेव धनजोडे, नामदेवराव धनजोडे, दिनेश साळवे, उत्तम पराते, लीलाधर धनविजय, मुन्ना पटेल, सुधीर मोहोड, हरीश पाटील, आबिद शेख, आमिर खान पठाण, मुकेश गायगवळी, विलास मामुलकर इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला

