अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६ सप्टेंबर:- संपूर्ण भारतीयांची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक कोसळले. त्या शिवद्रोही सरकारच्या विरोधात जाहीर निषेध मोर्चा सावनेर येथे दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन शिवद्रोही केंद्र सरकार,राज्य सरकार चा नारे निदर्शने करून निषेध करण्यात आला. मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नारे निदर्शने निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणारा जयदीप आपटे याला पुतळा बनविण्याचा कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुतळ्याचे टेंडर त्याला दिले.
त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुद्धा दोषी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेला खर्चाची रक्कम यांच्या खाजगी प्रॉपर्टीतून वसूल करण्यात यावी जयदीप आपटे याला फासावर लटकविण्यात यावे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हा देशद्रोह आहे यामध्ये राज्य सरकार दोषी आहे. या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे यामागे भयंकर षडयंत्र असल्याचे सिद्ध होत आहे या सर्व प्रकरणाची ईडी, सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी जय शिवाजी सामाजिक संस्था, संभाजी ब्रिगेड, जनकल्याण बहुउद्देशीय सामाजीक संस्था, भारतीय परिवर्तनवादी संघ, विशाखा महिला मंडळ, वंचित बहुजन आघाडी, लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी यांच्यावतीने तहसीलदार मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जय शिवाजी सामाजिक संस्था अध्यक्ष दिनेश इंगोले, जनकल्याण संस्था अध्यक्ष अध्यक्ष भगवान चांदेकर, दादाराव लांजेवार, संजय राऊत, संजय टेंभेकर, शकील जेडिया, मयूर नागदवने, विनोद तांदुळकर, प्रमोद सोनुले, कांचन ढवंगाळे, गणपती पठाणे, यशवंत पाटील, सुधाकर ढोबळे, शिवाजी धमदर, अनिल घटे, गजू कोमुजवार, राजीव सोनटक्के, योगेश खरपुडे, योगराज धानोरकर, विनोद मानकर, गजानन चौधरी, केदारनाथ भाटी, मतेलजी, गिरीश आंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.