मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारला सकाळी 11.00 वाजता शिवसेना वर्धा जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्या सूचनेनुसार माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमुख सतीश धोबे, ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले.
संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील संत श्री. रामगिरी महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमात एका सप्ताह मध्ये जे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली. या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला. त्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरच्या निषेध सभेत दिनांक 02 सप्टेंबर रोजी भर घालून परत वादग्रस्त व्यक्त करून या राज्यात धार्मिक भावना भडकिवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी.
कारण आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर च्या निषेध सभेत, बांगलादेश मधील हिंदू हत्याचार विरोधात निषेध रॅलीला संबोधन करताना मुस्लिम समाजाबाबत जी वादग्रस्त व्यक्तव्य केले. या महाराष्ट्र राज्यात तणावाची स्थिती निर्माण केली. अशा या धार्मिक भावना भडकावून देणाऱ्या लोकांना येथील जनता भिक घालत नाही. तरी राज्यात परिस्थितीवर नियंत्रण करण्याकरिता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने या राज्याचे राज्यपाल यांना निवेदनातून मागणी केली की, महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या धार्मिक भावना भडकविणाऱ्या आमदार नितेश राणेला कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी. अशी या निवेदनातून शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आली.
सदर निवेदन देताना उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक मनीष देवडे, मनोज वरघणे, गजानन काटवले, भास्कर ठवरे, फिरोज खान, शकील अहमद, नितीन वैद्य, शंकर झाडे, चंदू भुते, बंटी वाघमारे,प्रशांत सुपारे, अनंता गलांडे, अतिक मिर्झा, दिनेश धोबे, अमोल वादाफळे, शंकर भोमले, गणेश डेकाटे, भास्कर ठवरे, श्रीकृष्ण रामगडे, पंकज ठाकरे, पप्पू घवघवे, संजय खोंडे- युवासेना उपतालुकाप्रमुख, धीरज धोटे, प्रशांत कांबळे, मनीष इसनकर, हिरामण आवारी, सदानंद कोसुरकर, भास्कर मानकर, शकील अहमद, श्याम बोरधरे, आशिष जयस्वाल, भास्कर भिसे, शेख शब्दार, मारुती अराडे, सलमान रंगरेजा, करंण जनेकार, दिलीप कुकडे, किसन राऊत, राहुल मोहितकर, मोहन वानखेडे, संजय सोनूरकर व इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.