पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली. धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत फॅमिली सलून अँड स्पाच्या नावावर तरूनिकडून अवैध देह व्यापार करून घेण्यात येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून एका महिला आरोपीला बेड्या ठोकल्या असून 05 पीडित मुलींची सुटका करण्यात आली.
दि.09 सप्टेंबर रोजी ट्रू रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पा घर नंबर 597 स्टार्क इंटरप्राईजेस दुकानाच्या वर दुसरा माळा मेहाडिया चौक पोलीस ठाणे धंतोली नागपूर शहर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग मार्फत पोलिस ठाणे धंतोली हद्दीत मानवी व्यापार संबंधाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून पंचासह धाड टाकली असता 05 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. आरोपी प्रेमलता उर्फ प्रीती उर्फ डोली सुभाष चिंचुलकर वय 38 वर्ष राहणार व्हेटर्नरी कॉलेज जवळ मानव सेवा नगर प्रमोद मोतीलाल दवे यांच्या घरी किरायाने पोलीस ठाणे नागपूर या याची पोलीस ठाणे धंतोली येथे अप क्रमांक 404 /2024. ( 4, 5, 7 पिटा ॲक्ट अन्वये तक्रार दाखल करून अटक करण्यात आली आहे.
यावेळी आरोपी महिलेकडून 1 मोबाईल फोन अंदाजे किंमत 15000 हजार रुपये, कंडोम पॅकेट अंदाजे किंमत 10 रुपये, 3500 रुपये नगद, एक रजिस्टर हिशोबाची रजिस्टर किंमत 45 रुपये असा एकूण – 18555 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विवरण येणे प्रमाणे की नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी यातील नमूद महिला आरोपी ही स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता पिडीत मुलींना पैश्याचे आमीश देऊन पिडीतांकदून वेश्या व्यवसाय करवून घेताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध 4, 5, 7 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कायदा -1956 अन्वये पो. ठाणे धंतोली (नागपूर शहर) येथे गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती कविता इसारकर पोलिस निरीक्षक, सा. सु. वि., गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी दिली.