🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजता दरम्यान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हनुमान टेकडी येथे आयोजित रोजगार मेळाव्यात इक्विटास स्मॉल फायनन्स बँक, गिमाटेक्स टेक्सटाईल, हिंगणघाट व वणी, फ्लिपकार्ट ई-कामर्स प्रायवेट लिमिटेड, यशस्वी अकॅडमी फॉर स्किलींग, पुणे या नामांकीत कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या कडील अंदाजे रिक्त असलेली 657 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे मुळ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र रोजगारकार्ड घेऊन मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.