अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- संपूर्ण देशात सध्या नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आणि अंमलबजावणी याची चर्चा आहे. याच अनुषंगाने आणि जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन नागपूर येथे नुकतेच करण्यात आले.
धरमपेठ विज्ञान महाविद्यालय नागपूर, सिंधू महाविद्यालय नागपूर, भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर आणि रा. तू. म. नागपूर विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० आणि वनस्पतीशास्त्र अभ्यासक्रम” हा कार्यशाळेचा प्रमुख विषय होता. धरमपेठ महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेचे संयोजक डॉ.सुशील कुंजलवार अध्यक्ष अभ्यास मंडळ, सह-संयोजक डॉ. नितीन डोंगरवार, समन्वयक डॉ. विलास डोईफोडे, सह-समन्वयक डॉ.राजकुमार खापेकर तर डॉ. पितांबर हुमणे यांनी आयोजन सचिव म्हणून भूमिका पार पाडली.
सदर कार्यशाळेत स्नातक आणि स्नातकोत्तर स्तरावरील विविध बाबी जसे विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य-व्याप्ती, गुणदान आणि परीक्षण पद्धती, क्रेडिट पद्धत,संशोधन प्रकल्प-प्रशिक्षण, कार्यभार आणि तत्सम बाबींवर नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टिकोनातून सविस्तर आणि सचित्र मार्गदर्शन डॉ. डोंगरवार, डॉ. डोईफोडे, डॉ. हुमणे आणि डॉ. समीर देशपांडे यांनी केले.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अभ्यासक्रमातील सकारात्मक बाबी, त्रुट्या आणि भविष्यात सुधारनांचा वाव यावर गटचर्चा झाली. यात गटप्रतिनिधी म्हणून डॉ.अविनाश अणे, डॉ. मौसमी भोवाल, डॉ.अमित सेटीया यांनी विचार व्यक्त केले. विद्यापीठाने स्नातक स्तरावर प्रथम वर्षाला तीन, द्वितीय वर्षाला दोन व तृतीय वर्षाला एक असे मुख्य विषय पद्धती अवलंबावी असे एकमत प्रकर्षाने पुढे आले. या कार्यशाळेतील महत्वाचे ठराव अभ्यामंडळात विचारार्थ घेऊन मान्यतेसाठी विद्यापीठाकडे कळविण्याचे आश्वासन अध्यक्ष डॉ. कुंजलवार यांनी दिले. या कार्यशाळेकरिता नागपूर,वर्धा, भंडारा,गोंदिया जिल्यातील ८० पेक्षा जास्त प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. यावेळी उपस्थित्यांच्या वतीने डॉ.अश्विन फुलझेले व डॉ. अश्विनी मोवाडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विनोद डोंगरे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजकुमार खापेकर तर आभारप्रदर्शन डॉ.बालाजी राजूरकर यांनी केले. या कार्यशाळेकरिता डॉ. अखिलेश पेशवे, डॉ. व्ही. एम. पेंडसे, डॉ. पराग निमिशे, डॉ. आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता डॉ. रुपेश बडेरे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. पुनिता तिवारी, डॉ. चंद्रकुमार पटले, सुस्मिता सिंग, डॉ. स्वेता राय, अमोल पिंपळशेंडे यांचे सहकार्य लाभले. नियमितपणे अशा कार्यशाळा आयोजित केल्यास संबंधित सर्वांना शैक्षणिक लाभ होईल अशी सर्वांनी आशा व्यक्त केली.