प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मंगळवार, दि. १० सप्टेंबर २०२४ पासुन तहसील कार्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरीक व निराधारांचे अत्याचार मुक्ती संघर्ष समिती मंगला ठक यांनी निराधार, शेतकरी व असंघटीत वर्गाला न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरवात केली या वेळेस निराधार महिला पुरुष उपस्थित होत्या तसेच या धरणे आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनेने पाठींबा दिला त्यांनी शासन /प्रशासनाकडे मागणी केली.
1) ५५ वर्षावरील वयोवृध्द निराधार व शेतकऱ्यांना ५००० रु. महिना मानधन मिळावा.
2)) निराधारांची उत्पन्न मर्यादा २१००० वाढून ५० हजार करण्यात यावी निराधारांना व शेतकऱ्यांना नियमित अनुदान मिळण्यात यावे.
3) घर तेथे शौचालय त्या प्रमाणे प्रत्येक राशनकार्ड धारक महिलांना प्रत्येक घरी एक शिलाई मशीन मिळावी जेनेकरुन त्यांना घरघुती उद्योग करता येईल.
4) शेतकऱ्यांचा मालाचा हमी भावाचा कायदा करणे बाबत.
5) शहरी व ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कायम स्वरुपी पट्टे मिळणे बाबत.
6) जबरण जोत शेतकऱ्याला व जमीन धारकाला कायम स्वरुपी जमिनीचे पट्टे देणे बाबत झुडपी अंतर्गत.
7) सरकारने घरकुल मध्ये ड क्रमांक यादी थांबवून गरजूंना घरकुल योजनेपासून वंचित केले आहे.
सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई ठक यांचे नेतृत्वात निराधार , शेतकरी व असंघटित वर्गाचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय हिंगणघाट येथे आज दिनांक 10 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या वेळी शेतकरी किसान समितीचे निशिकांत शिंगरू, चिंतामण दारुंनकर, दिवाकर आसोले, गजानन भोमाले, शेषराव बोयर, गीता भागत, मालू लोणकर, कुसुम नगराळे, सुमन भगत व अनेक पुरुष माता भगिनी नी या धरणे आंदोलनात हजेरी लावली.