आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. १२ रोजी हिंगणघाट तालुक्यातील मुरपाड (सेलू) गावातील असंख्य महिलांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने मनीषा उमाकांत विरुटकर, बेबी गुंजेकार, बिंदिया हरबडे , पुष्पा दातारकर, ज्योत्स्ना बदखल, वंदना हाडके, प्रतिभा गनफाडे, शितल वाकमोडे, माया नाईक, माया साळवे, कल्पना बदखल, संगीता नेहारे, रसिका विरुटकर, अभिलाषा नाईक, सुलोचना तामगाडगे, सुप्रिया तामगाडगे, सविता ऊईके, विनोदराव दातारकर ईत्यादीसह अनेक महिला कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, जिल्हा महामंत्री भाजपा आकाश पोहाणे , हिंगणघाट ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद विटाळे, हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे , समाजसेवक सुनील डोंगरे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.