प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय जुदो स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करुन वस्ताद लहूजी साळवे प्रशिक्षण केंद्राचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
जिल्हास्तरीय शालेय जुदो स्पर्धेत 14 वर्षा खालील मुले भूषण हेमंत तेलरांदे 25 किलो वजन गटात, शिव श्रीधर कोटकर 40 किलो वजन गटात, ओजस नितीन सुकळकर 45 किलो वजन गटात, सक्षम महेंद्र परबत 50 + किलो वजन गटात तसेच 14 वर्ष खालील मुली गुंजन नरेश पुरी 35 किलो वजन गटात, चंचल कापसे 38 किलो वजन गटात, अनन्या सोंकुसरे 40 किलो वजन गटात, स्वरांजली नरेश भडे 45 किलो वजन गटात यश प्राप्त केले आहे.
17 वर्ष खालील मुलें – प्रथमेश सुनील आंधे 40 किलो वजन गटात, अरमान दिनेश धनरेल 50वकिलो वजन गटात, तुषार देवतळे 55 किलो वजन गटात, माहीम लांडगे 60 किलो वजन गटात, कुणाल भोकरे 65 किलो वजन गटात, प्रथमेश खोडे + 90 किलो वजन गटात, भुषण थेटे 90 किलो वजन गटात. 17 वर्ष खालील मुली
अवंतिका भादेकर -44, अक्षरा भेंडे -48, केसर विनायक लाखे 56 वर्ष गटात यश प्राप्त केले आहे.
एकुण 18 सुवर्ण व 7 रौप्य पादकांची लुट करुण आपल्या उस्ताद लहुजी साळवे प्रशिक्षण केंद्राचे व हिंगणघाट शहराचे नाव लौकीक केले असुन नागपुर येथे होणाऱ्या विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी या सर्वांची निवड झाली.
तसेच या स्पर्धेत तन्मय कोसुसकर, वैभव खोडे, चिन्मय ठोंबरे, वेदिका कापसे, कशिश चिंचुलकर, वैष्णवी पेंन्दे, इशा फाले यांनी रौप्य पदक प्राप्त केले. या सर्व विजयी खेळाडूंचे आमेच्युअर जुदो असोसिएशनचे सचिव विठ्लराव अवचट आणि प्राध्यापक डॉ. बलराज (राजु) अवचट यांनी कौतुक केले. या सर्व खेळाडुंनी आपल्या यशाचे श्रेय सुबोध महाबुधे तसेच सह प्रशिक्षक विशाल कस्तुरे, स्मित श्रावणे, सतिश वरघने यांना दिले.

