विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एटापल्लीच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विषयक तसेच रस्ते व पूल संदर्भात समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, 1) (आष्टी-अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गचे काम, एटापल्ली ते चोखेवाडा राज्य महामार्ग) 2) सिरोंचा येथे स्वतंत्र बस आगार मंजूर करण्याबाबत. 3) एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उपलब्ध करण्याबाबत
अशा विविध मागण्या बाबत निवेदन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना महाविकास आघाडी पदाधिकारी आढावा बैठकीत देण्यात आले. वरील विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी उपस्थित युवासेना तालुका प्रमुख अक्षय पुंगाटी, पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी, तालुका संघटिका अरुणा निकोडे, उपतालुका संघटिका शालिनी नैताम, शाखा प्रमुख तोडसा ऋषभ दुर्गे, शाखा प्रमुख एटापल्ली तेजस गुज्जलवार तसेच शिवसेना कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.