मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात महविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. आजवर लढत असलेल्या जागा सोडण्याची वेळ यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षावर येणार आहे.
हिंगणघाट – समुद्रपुर – सिंधी (रेल्वे) विधानसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस परंपरागत विरोधक आहेत. आता मात्र विठ्ठल गुळघाणे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अडचणीत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी मागील 2 वर्षापासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यांनी अनेक आंदोलनातून तालुक्यातील लोकांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडले आहे. पण या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मतदारसंघावर दावा केला असून विठ्ठल गुळघाणे हे उमेदवारीचे बार्शिंग बांधून तयार झाले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रा. राजू तीमांडे यांनी पण आमदारकीची सिट मिळण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदार संघात एक फुल आणि तीन माळी अशी स्थिती दिसून येत आहे.
अतुल वांदीले होणार उमेदवार?
महाराष्ट्र संदेश न्युजला सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना सोडली जाऊ शकते. कारण माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांचा मागील दोन सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे अतुल वांदीले यांची दावेदारी मजबूत दिसून येत आहे.
हिंगणघाट मतदार संघात लगातार तीन टर्म कुणी निवडून येत नाही. त्यामुळे कोणालाच कोणाची शाश्वती देता येत नाही. इथं उमेदवाराला ठरवून पाडले जातात. जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात हावी असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणाचीही लॉटरी लागते, याकडे लक्ष लागलं आहे. हा इतिहास बघता या वेळी मतदार कोणाला पाडणार, याचीच अधिक चर्चा येथे रंगलीय.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार समीर कुणावर केले होते. भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने ही जागा आपल्या ताब्यात घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांना उमेदवारी दिली होती. तिमांडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली, तर तीन वेळा आमदार राहिलेले अशोक शिंदे यांना 15 हजार मतांचाही आकाडा गाठता आला नव्हता.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राजकीय हवा नेहमीच बदलत राहाते. येथे तेली विरुद्ध कुंभी समाजाचे वर्चस्व आहे त्यामुळे येथे एखाद्याला ठरवून पाडले जाते आणि दुसऱ्याला विजयी केले जाते. मागील निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाचे असतानाही मतदारांनी समिर कुणावर यांना डोक्यावर घेतले होते. ते स्वबळावर निवडून आले होते.
समीर विरुद्ध अतुल ‘सामना’?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे म्हणून हिंगणघाट पासून ते मुंबई पर्यंत आंदोलन केले होते. सर्वात जास्त तरुणाचा भरणा अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. त्यात तेली समाजाने अतुल वांदीले यांना साथ दिले तर ते उमेदवारी होऊ शकते. मात्र त्यांनी सबुरीचे धोरण अवलंबले. आता या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. जागा वाटपाचा निर्णय अद्याप अंतिम झाला नसताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विठ्ठल गुळघाने यांचे नाव रेटून धरले आहे.