उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथील म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणपती विसर्जनाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. 10 दिवस गणपतीची स्थापना झाल्यानंतर आज गणपती विसर्जनाच्या दिवशी 18 वर्षीय तरुण गणेश गायकवाड गेला होता. यावेळी त्यांचा पूर्णा नदी पात्रात दुबून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
अकोल फेल भागात राहणारा गणेश दुपारच्या सुमारास आपल्या आई बरोबर घरगुती गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी म्हैसांग येथे पूर्णा नदीवर गेला होता. तो पाण्यात उतरला पण त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे गणेश हा नदीच्या पाण्यात बुडाला. यावेळी तिथे गणपती विसर्जनासाठी आलेल्या इतर नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढलं. त्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेलं. पण तिथं तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गणेशच्या अशा आकस्मिक मृत्यूने गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अकोल्यातील या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अशा दुर्घटना टाळण्यासाठी गणेशभक्तांनी विसर्जनावेळी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.