आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या सिंदी (रेल्वे) ते पिपरा या गावापर्यन्त अंतर 3 किलोमिटर असून या रोडवर एक जूना सन 1983 मध्ये बांधलेला कमी उंचीच्या पूल आहे. या परिसरात थोडा जरी पाऊस आला की सिंदी ते पिपरा या रस्त्यावरून वाहतूक बंद होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप मागील अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे.
सदर मार्ग हा हमदापूर, हेलोडी, पळसगाव, सेवाग्राम, वर्धा, सेलडोह इत्यादि गावाना जाण्या करीता ग्रामस्थाना जानास अत्यंत सोहीसकर मार्ग आहे परंतु कमी उंची च्या पूल कच्चा रस्ता मुळे या रस्ताने ग्रामस्थाना, विध्यार्थी , रुग्णाला गैरसोय होत आहे. पावसाळ्यात चारही महीने हा वाहतूकीस योग्य नसतो त्यामुळे गावातील नागरिकाना वाहतूकीस अंत्यत त्रासाला सामोर जावे लागत आहे. त्यामुळे या रस्तावरील पुलाची 15 फूट उंची वाढवून नवाने बांधण्यात यावा व रस्ता उत्तम दर्जाचा बनवण्यात येऊन वाहतूक योग्य करून देण्यात यावी. तसेच पिपरा हि अंदाजे 50 घराची वस्ती असून या गावात अजून शुध्द पाण्याचा पाणाची व्यवस्था नाही त्यामुळे पिपरा या गावात डेंगू, मलेरिया, टायफाईट सारखा रोगाचे थैमान घातला आहे. तरी पिपरा या गावात पाण्याची टाकी बसवून फील्डर प्लांट लवकर लावण्यात यावा जेणेकरून ग्रामस्थाना 12 ही महीने पाण्याचा पाणाची व्यवस्था होईल असे निवेदन तहसीलदार सिंदी मार्फत जिलाधिकारी वर्धा याना देण्यात आले.
या प्रसंगी भाग्यश्री ढोबळे, शशिकला कळसकर, रिना ढोबळे, रंजना ढोबळे, रमा ढोबळे, अल्का गोडघाङे, अंजना ढोबळे, मंदा ढोबळे, किरण कांबळे, विनोद, पाटील, गजानन ढोबळे, भिमराव फूलमाळी, ईश्वर कळसकर सह अनेक नागरिक आणि कार्यकर्ता उपस्थिति होते.