खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कवठा येथील सरपंच प्रविन जायदे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला. नंदोरी येथील नेमाडे सभागृहात अत्यंत उत्साहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले यांची उपस्थिती होती.
यावेळी सरपंच प्रविन जायदे यांच्यासह घनश्याम गिरी, राजू बूटे, पुरुषोत्तम भडे, दिपक हाडके, धाडसे, मारुती कोवे, मनोज डबले, विलास लभाने, राजू उरकुडे, निखिल आखूड, बालु लढी, महेश खिरडकर, अंबादास पांडे, मनोज नाकतोडे आदींनी पक्ष प्रवेश केला. यावेळी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षाचा दुप्पटा घालून व पुष्पगुच्छ देऊन खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे, तालुका बूथ अध्यक्ष गणेश वैरागडे, सरपंच साहेबराव येडे, सरपंच वैशाली लोखंडे, मिना छोयले, उपाध्यक्ष मंगेश गिरडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, संतोष घोडे पाटील, डॉ. प्रवीण खेडकर, दाभणे गुरुजी, अशोक महाजन, संजय लोणकर, अरुण सावरकर, तुषार थुटे, अशोक सुमटकर, रोशन थुटे, चेतन काळे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.

