मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809
*कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त आणि तुटपुंज्या मिळत असलेल्या वेतनावर काम करावा लागतो. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई आणि त्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करून जगावा लागतो. आपल्या प्रलंबित प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना वारंवार आंदोलन करावे लागते ही एक प्रकारची शोकांतिका आहे. हे, बघून मुळ गाव देऊळगाव येतील सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असलेल्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या खरमतटोला येतील अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी सेविका शिल्पा सुखदेवे व मदतनीस शमा रामटेके यांची भेट घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला लेखणीच्या माध्यमातून तुमच्या समस्या मी पोहोचविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन म्हणून त्यांना पाठींबा सुद्धा दिला. त्यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका शिल्पा सुखदेवे व मदतनीस शमा रामटेके म्हणाल्या की, संगीताताई ठलाल या पहिल्या महिला आहेत की, त्यांनी स्वतः आमच्यापर्यंत येऊन आमची भेट घेतली आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि आम्हाला पाठींबा दिला. म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे त्यांनी आभार मानले. त्यावेळी अंगणवाडीत उपस्थित असलेले अंगणवाडी सेविका शिल्पा सुखदेवे, मदतनीस शमा रामटेके, एकल सेंन्टर संयोजिका शिशुकला लंजे, त्या दिवशी लसीकरण असल्यामुळे देऊळगाव येतील आरोग्य कर्मचारी छाया जोगे,आरोग्य सहाय्यक करिश्मा राऊत,आरोग्य सेविका जास्वंदा नारनवरे, आशावर्कर निराजंना मेश्राम, आशा गटप्रवर्तक संगीता मेश्राम, अनुसया हनवते, गावातील महिला विध्या जक्नवार,अमिता सुखदेवे,जयमाला रामटेके, सुप्रिया शेंडे माधुरी कुमरे, अंगणवाडीतील लहान मुले उपस्थित होते.